वार्षिक सोहळे Annual Celebrations

उत्सव आणि त्यांचे महत्त्व

Utsav & Their Significance

नृसिंहवाडीत वर्षभर होणाऱ्या पवित्र उत्सवांची माहिती Sacred festivals celebrated throughout the year at Nrusinhwadi

उत्सव मूर्ती
श्री दत्तदेव — उत्सव काळातील भव्य सजावट Shri Dattadev — Grand festival adornment
उत्सवाचे महत्त्व Importance of Festivals

नृसिंहवाडीत वर्षभर अनेक पवित्र उत्सव साजरे होतात. प्रत्येक उत्सव हा एक विशेष धार्मिक महत्त्व बाळगतो. या उत्सवांच्या निमित्ताने देशभरातून लाखो भक्त येतात आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे आशीर्वाद घेतात. उत्सव काळात देवाची भव्य सजावट, पालखी मिरवणूक, भजन-कीर्तन, प्रवचन यांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय होते.

Throughout the year, Nrusinhwadi hosts numerous sacred festivals. Each festival carries special religious significance. Millions of devotees from across India visit during these celebrations to receive the blessings of Shri Nrusinha Saraswati. During festivals, the deity is adorned magnificently, and the entire atmosphere vibrates with Palkhi processions, bhajan-kirtan, and discourses.

प्रमुख उत्सव Major Festivals
मार्गशीर्ष Margashirsh (Dec)

श्री दत्त जयंती उत्सव 🎉

Shree Datta Jayanti Utsav 🎉

मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते पौर्णिमा (डिसेंबर)

Margashirsh Shudh Saptami to Poornima (December)

श्री दत्तगुरूंच्या जन्माचा हा सर्वात महत्त्वाचा उत्सव. नऊ दिवस भव्य कार्यक्रम होतात. हजारो भक्त दूरदूरून येतात. विशेष पालखी सोहळा व अभिषेक होतो.

The most important festival celebrating Lord Dattatreya's birth. Nine days of grand celebrations draw thousands of devotees from far and wide. Special Palkhi procession and grand Abhishek are performed.

आश्विन Ashwin (Oct)

शारद नवरात्री उत्सव 🌟

Sharad Navratri Utsav 🌟

आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी (ऑक्टोबर)

Ashwin Shudh 1st to 10th day (October)

नऊ दिवसांचा भव्य नवरात्री उत्सव. विजयादशमी पासून श्री नृसिंह सरस्वती श्री दत्तदेवांची पालखी सोहळा सुरू होतो. भक्तांसाठी विशेष पूजा व दर्शन.दहा दिवस पहाटे व मध्यान्हकाळी महापूजा असते.

Nine days of grand Navratri celebrations. From the 10th day, the Palkhi festivities of Shri Narsinha Saraswati Shri Dattadev begin with great fanfare.

आश्विन Ashwin (Oct)

गुरु द्वादशी उत्सव 🙏

Guru Dwadashi Utsav 🙏

आश्विन वद्य षष्ठी ते द्वादशी

Ashwin Vadya Shashthi to Dwadashi

श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या निजानंदगमनाचा उत्सव. या दिवशी स्वामींनी गुप्त स्वरूप धारण केले असे मानले जाते. भक्त विशेष प्रार्थना करतात. कीर्तन, प्रवचन सेवा आयोजित केली जाते

Celebration of the Nijananandagamana (departure) of Shri Nrusinha Saraswati Swami Maharaj. Devotees offer special prayers on this spiritually significant occasion.

माघ–फाल्गुन Magh–Phalgun (Feb–Mar)

गोपाळ काला उत्सव 🎊

Gopal Kala Utsav 🎊

माघ पौर्णिमा ते फाल्गुन पंचमी

Magh Poornima to Phalgun Panchami

या काळात मोठ्या उत्साहाने कार्यक्रम होतात. भक्तांची मोठी गर्दी असते व दाही दिशांनी भाविक येतात. संपूर्ण पाच दिवस मंदिर बंद नसते. २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले असते. या काळात महापूजा रात्री होते. त्यानंतर पालखी सेवा असते.

This festival is associated with the divine Leela of Shri Krishna. Days of joyous celebrations attract devotees from all directions, filling the holy town with devotional energy.

भाद्रपद Bhadrapad (Sep)

श्रीपाद श्रीवल्लभ जयंती ✨

Sripada Srivallabha Jayanti ✨

भाद्रपद मास — गणेश चतुर्थी दिवशी

Bhadrapad Masa — on Ganesha Chaturthi Day

दत्ताचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची जयंती. गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. ह्या दिवशी सकाळी सूर्योदयास जन्मकाल सोहळा होतो

Celebration of Sripada Srivallabha — the first avatar of Lord Dattatreya in Kali Yuga. Observed on the auspicious day of Ganesha Chaturthi.

पुष्य Pushya (Jan)

नृसिंह जयंती - श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा जन्मकाल 🌸

Nrusinha Jayanti 🌸

हिंदू पंचांगानुसार पौष शुद्ध द्वादशी रोजी

Hindu calendar Pushya month

श्री नृसिंह सरस्वती स्वामींची जयंती. या दिवशी विशेष अभिषेक, पूजा व कीर्तन होते. भक्त उपवास करून स्वामींची आराधना करतात.ह्या सात दिवसांच्या जन्मोत्सवाच्या काळात कीर्तन, प्रवचन व सेवेचे आयोजन केले जाते.

Birth anniversary of Shri Nrusinha Saraswati Swami. Special abhishek, puja and kirtan are performed. Devotees observe fast and offer special prayers.

दक्षिण द्वार Special Event

दक्षिण द्वार सोहळा 🌊

Dakshin Dwar Sohala 🌊

विशेष नैसर्गिक घटना

Special natural phenomenon

हा एक अत्यंत दुर्मिळ व चमत्कारिक सोहळा आहे ज्यात कृष्णा नदीचे पाणी मंदिराच्या उत्तर द्वारातून प्रवेश करून, श्री दत्त महाराजांच्या चरणपादुकांवरून दक्षिण द्वारातून बाहेर पडते. या तीर्थामध्ये स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते.याचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी येथे येत असतात.

A rare miraculous event when Krishna river water flows from the North gate to South gate through the temple. This extraordinary natural phenomenon is considered a divine miracle and draws massive crowds.

नित्य पालखी सोहळा Daily Palkhi Procession

दरोज रात्री ८:०० वाजता श्री दत्तदेवांची भव्य पालखी मिरवणूक निघते. हा नित्योत्सव शतकानुशतके चालत आलेला आहे. भक्त या पालखी सोहळ्यात सहभागी होतात व भजन-कीर्तन गात श्री दत्तदेवांची आराधना करतात. हे दृश्य पाहणे व यात सहभागी होणे हा एक दिव्य अनुभव आहे.

Every evening at 8:00 PM, the grand Palkhi procession of Shri Dattadev takes place — a tradition that has continued for centuries. Devotees join this daily procession, singing bhajans and kirtan in divine praise. Witnessing and participating in this ritual is a profoundly spiritual experience.

🌙 दररोज रात्री ८:०० वाजता Every evening at 8:00 PM
कन्यागत महापर्व — एक अभिनव पर्वणी Kanyagat Mahapaarva — A Rare Sacred Occasion

🌊 दर बारा वर्षांनी येणारा विशेष महासोहळा

🌊 Grand Celebration Every Twelve Years

गुरू कन्या राशीत गेल्यावर वर्षभर महापुण्यकाल सुरू असतो — त्यालाच कन्यागत महापर्वकाल म्हणतात. दर १२ वर्षांतून एकदा येथे गंगा अवतीर्ण होते आणि उत्सव मूर्तीला त्या गंगेत शाही स्नान घातले जाते. मिरवणुकीत हत्ती, घोडे, छत्र, चामर, चौघडा यांचा जल्लोष असतो.

When Jupiter enters Virgo, a year-long Maha Punyakaal begins — the Kanyagat Mahaparvakaal. Every 12 years, the Ganga descends here, and the Utsav Murti receives the royal Shahi Snan. The grand procession features elephants, horses, royal umbrella, fans and musical bands.

🏆

देवळातून स्वामींची पालखी शुक्लतीर्थस्थानी आणण्यासाठी तब्बल १५ तासांचा अवधी लागतो — अंतर १ किलोमीटरपेक्षाही कमी असले तरी! कारण प्रत्येक घरासमोर पालखी थांबते व सुवासिनी आरती करतात. मार्गावर मखमली व फुलांच्या पायघड्या घातल्या जातात.

The Palkhi procession takes 15 full hours to reach Shuklatiitha — less than 1 km away! Because the Palkhi stops at every home as women perform aarti. Velvet and floral carpets are laid on the path for the divine procession to pass over.

दक्षिणद्वार पर्वणी Dakshin Dwar Parvani

🌊 एक अद्भुत नैसर्गिक चमत्कार

🌊 A Miraculous Natural Phenomenon

कृष्णा नदीची पातळी वाढल्यावर मंदिरात पाणी प्रवेश करते

Occurs when the Krishna river level rises into the temple

नदीकाठी असलेल्या या मंदिरात कृष्णा-पंचगंगेची पातळी वाढल्यावर उत्तर द्वारातून पाणी पादुकांवरून दक्षिण द्वारातून बाहेर येते — ही एक महान पर्वणी असते! भक्तजन या दक्षिण द्वारी स्नान करतात व आपले जीवन कृतार्थ झाल्याचे मानतात. धन्य ती दक्षिणद्वार पर्वणी!

When the Krishna-Panchganga level rises and water enters the temple, it flows from the North gate, passes over the sacred Padukas, and exits through the South gate — this is the divine Dakshinadwar Parvani! Devotees bathe at the South gate considering their lives fulfilled.