नृसिंहवाडीशी संबंधित महान विभूती Great Saints Associated with Nrunsinhwadi
नृसिंहवाडीच्या पवित्र भूमीशी संबंधित चार महान संत विभूतींचा परिचय Introduction to four great saints associated with the sacred land of Nrunsinhwadi
श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयांचे कलियुगातील प्रथम अवतार मानले जातात. त्यांचे जीवन व लीला श्री गुरुचरित्र या ग्रंथात वर्णिलेल्या आहेत. भाद्रपद मासात गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांची जयंती साजरी केली जाते. नृसिंहवाडीच्या मनोहर पादुकांमध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचेही अस्तित्व मानले जाते — म्हणून नित्यपूजेमध्ये "श्री दत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती देवताप्रीत्यर्थ असा संकल्प केला जातो".
Sripada Srivallabha is revered as the first avatar of Lord Dattatreya in Kali Yuga. His life and divine deeds are described in the sacred Shri Gurucharitra. His birth anniversary is celebrated on Ganesha Chaturthi day in Bhadrapad. The Manohar Padukas at Nrunsinhwadi also embody the presence of Sripada Srivallabha — when the Padukas were established, the sankalpa was in the name of both Sripada Srivallabha and Nrusinha Saraswati.
श्री नृसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार. नृसिंहवाडीत त्यांनी बारा वर्षे तपश्चर्या केली आणि येथेच मनोहर पादुका स्थापित केल्या. ते भक्तवत्सल, करुणासागर व सिद्धपुरुष होते. त्यांच्या जीवनलीलांचे वर्णन श्री गुरुचरित्र या ५२ अध्यायांच्या ग्रंथात आहे. त्यांनी भैरंभट्ट जेरे यांना सांगितले — "पादुकांच्या रूपाने मी येथेच कायम राहणार आहे."
Shri Nrusinha Saraswati is the second avatar of Lord Dattatreya. He performed twelve years of penance at Nrunsinhwadi and established the Manohar Padukas here. Compassionate, powerful and saintly, his divine deeds are described in the 52-chapter Shri Gurucharitra. He assured Bhairavbhat Jere: "In the form of these Padukas, I will remain here permanently."
श्री नारायण स्वामी महाराज हे सरस्वती संप्रदायातील थोर संत होते. श्री टेंबे स्वामी महाराजांनी युवाशिक्षा ग्रंथात त्यांचे चरित्र दिले आहे. टेंबे स्वामी लिहितात — "कृष्णापंचनद्योगेऽर्च्य श्रीदत्तपादुके। भक्त्या नारायणस्वामी जीवन्मुक्तोऽधुना भवत्॥" नृसिंहवाडीत त्यांचे मंदिर आहे व पालखी सोहळ्यात त्यांच्या मंदिरातूनच उत्सव मूर्ती आणली जाते.
Shri Narayan Swami Maharaj was a great saint of the Saraswati Sampradaya. Shri Tembe Swami describes him in the Yuvashiksha scripture, writing: "By devoutly worshipping the Shri Datta Padukas at the confluence of Krishna-Panchganga, Narayan Swami attained the state of Jivanmukta (liberated while alive)." His temple exists at Nrunsinhwadi and the Utsav Murti is brought from his temple during the Palkhi procession.
श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) हे दत्तात्रेयांचे साक्षात अवतार मानले जातात. भारतभ्रमण केल्यानंतर त्यांनी नृसिंहवाडीत बारा वर्षे वास्तव्य केले. त्यांनी नृसिंहवाडीला "दत्तांची राजधानी सुखाची" म्हणून संबोधले. त्यांच्या प्रसिद्ध कृष्णालहरी स्तोत्रात कृष्णामातेची स्तुती आहे. नृसिंहवाडीत त्यांनी राहिलेला कक्ष आजही जपला गेला आहे.
Shri Vasudevanand Saraswati (Tembe Swami) is regarded as a direct incarnation of Lord Dattatreya. After travelling all of India, he resided at Nrunsinhwadi for twelve years and declared it the "Capital of Datta devotees." His celebrated work Krishnalahri praises Krishnamaata. The room where he stayed at Nrunsinhwadi is preserved to this day.
श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायाचा सर्वात पवित्र ग्रंथ असून त्यात श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे जीवन, तत्त्वज्ञान यासाठी मुख्य आधारभूत ग्रंथ व अलौकिक लीला ५२ अध्यायांत वर्णन केल्या आहेत. नृसिंहवाडीत या ग्रंथाचे नियमित सप्ताह होतात.
The sacred Shri Gurucharitra describes the divine life and miracles of Shri Nrusinha Saraswati across 52 chapters. Regular Saptah (7-day recitations) of this scripture are held at Nrunsinhwadi throughout the year.